breaking-newsTOP Newsक्रिडादेश-विदेश

AUS vs SA: डेव्हिड वॉर्नरचे 100 व्या कसोटीत शतक; तो ठरला 10 वा फलंदाज

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वॉर्नरचे टेस्ट क्रिकेटमधील 25 वे शतक

कसोटी क्रिकेटमध्ये शतकाशिवाय तीन वर्षांचा दुष्काळ असतानाही, डेव्हिड वॉर्नरने आपल्या 100 व्या कसोटी सामन्यात 200 धावा पुर्ण केल्या आहेत. 2 षटकार आणि 14 चैकार लगावत वॉर्नरने अवघ्या 254 चेंडूंमध्ये 200 धावांचा आकडा गाठला आहे. कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर चैकारी फटका लगावत आपले शकत पुर्ण केले आहे.

सलामीवीर म्हणुन 100 व्या कसोटी सामन्यात शतक करणारा वॉर्नर हा 10 वा खेळाडू ठरला आहे. तर हा पराक्रम करणारा दुसरा तो ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज रिकी पाँटिंग पहिला खेळाडू आहे. सोबतच १०० व्या कसोटी सामन्यात दुहेरी शतके करणारा पाँटिंग हा पहिला खेलाडू आहे.

तब्बल तीन वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा फंलदाज डेव्हिड वॉर्नरने आपल्या शतकाचा दुष्काळ संपवला आणि रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव कोरले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेली बॉक्सिंग डे कसोटी हा वॉर्नरचा रेड-बॉल फॉरमॅटमधील 100 वा सामना आहे. त्याने या सामन्यात आपले 25 वे टेस्ट शतक केले आहे. 100 व्या कसोटीत शतक ठोकणारा क्रिकेटच्या इतिहासातील तो 10 वा फलंदाज ठरला आहे.


शंभराव्या सामन्यात शतक ठोकणार हे आहेत खेळाडू :

कॉलिन काउड्री (इंग्लंड), 1968
जावेद मियाँदाद (पाकिस्तान), १९८९
जीसी ग्रीनिज (वेस्ट इंडीज), 1990
अॅलेक स्टीवर्ट (इंग्लंड), 2000
इंझमाम उल हक (पाकिस्तान), 2005
रिकी पाँटिंग (2) (ऑस्ट्रेलिया), 2006
ग्रॅम स्मिथ (दक्षिण आफ्रिका), 2012
हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका), 2017
जो रूट (इंग्लंड), 2021
डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया), 2022*

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button