पिंपरी / चिंचवड

बेदम मारहाण केल्यानंतर उशीने तोंड दाबून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न

पतीला अटक

पिंपरी l प्रतिनिधी

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 15) दुपारी सव्वातीन वाजता रासे फाटा, शिक्रापूर रोड येथे घडली.

मोहन आदिनाथ पाळवदे (वय 25, रा. रासे फाटा, शिक्रापूर रोड, ता. खेड. मूळ रा. पिंपरी झोळा, ता. गंगाखेड, जि. परभणी) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी 19 वर्षीय पत्नीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगळवारी दुपारी त्यांच्या शेजारच्या घरी जेवण करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी पती मोहन याने फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेऊन लाटणे, विद्युत वायर, कुकर आणि हाताबुक्क्यांनी मारहाण केयी. शिवीगाळ करून खाली पाडले. त्यानंतर थांब तुला जावेच मारतो, असे म्हणून उशीने तोंड दाबून फिर्यादी पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button