breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

ATM मधून पैसे काढताना ATM मध्ये कार्ड अडकलं तर ? पहा काय करायचं …

ATM मधून पैसे काढताना अचानक कधीतरी एटीएम कार्ड मशीनमध्ये अडकतं. अशावेळी अनेकदा आपण घाबरुन जातो. आणि ते अडकलेलं कार्ड घाई घाई काढण्याच्या नादात कधी कधी ते तुटण्याचीही भिता असते…पण अशा वेळी घाबरून न जाता काही सोप्या स्टेप्सनी कार्ड बाहेर काढू शकतो. कसं ते पाहुया…

एटीएम कार्ड, एटीएम मशीनमध्ये अडकल्यास याची सूचना तात्काळ आपल्या बँकेला द्या. कस्टमर केयरला फोन करुन एटीएमचं लोकेशन अर्थात ठिकाण, कार्ड अडकल्याचं कळवावं.

कस्टमर केयरला फोन केल्यानंतर ते दोन पर्याय सांगतिल. कार्ड कॅन्सल करणं आणि दुसरा कार्ड पुन्हा घेण्याचा पर्याय.

जर कार्ड काढताना खराब झालं तर, बँक 7 ते 10 दिवसांत नवीन कार्ड ग्राहकाच्या पत्त्यावर पाठवून देते. कमीत-कमी वेळेत कार्ड मिळण्यासाठी बँकच्या जवळच्या शाखेत भेट देऊ शकता. जर एटीएममध्ये अडकलेलं कार्डचं परत हवं असल्यास, बँकेला सूचना देऊ शकता. एटीएम तुमच्याच बँकचं असल्यास कार्ड परत मिळणं अधिक सोपं होत. परंतु कार्ड दुसऱ्या बँकेचंआणि तुम्ही पैसे काढत असलेलं ATM हे दुसऱ्या बँकेचं असल्यास, ती बँक तुमच्या बँकेत कार्ड पाठवते.

एटीएममध्ये कार्ड अडकण्याची कारणं कोणती असू शकतात ?

एटीएममध्ये कार्ड अडकण्याची तीन कारणं असू शकतात. पहिलं कारण, एटीएम लिंक फेल होणं, दुसरं कारण कार्ड मशीनमध्ये टाकल्यानंतर पिन, पैसे फीड करण्यासाठी वेळ लागणं आणि तिसरं कारण मशीनचा पॉवर सप्लाय अचानक बंद झाल्यावरही कार्ड अडवू शकतं.

अडकलेलं कार्ड सर्वात आधी जो एटीएममध्ये पैसे अपलोड करतो त्याला मिळू शकतं. तो हे कार्ड बँकेत जमा करतो. हे सर्व आरबीआयच्या गाईडलाईन्सच्या अंतर्गत गोपनीयरित्या होतं.

जर हे कार्ड दुसर्‍या बँकेचं असेल, तर ते कार्ड बँक संबंधित बँकेत पाठवेल. तुमच्या बँकेकडून तक्रार मिळाल्यानंतर, बँक शेवटच्या व्यवहाराची पावती घेऊन, तुम्हाला कार्ड परत करतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button