breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

अधिकाऱ्यांना मस्ती आली आहे का? चीफ इंजिनिअरवर अजित पवार खवळले

संभाजीनगर : संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विकास कामांचा आढावा बैठक घेण्यासाठी अजित पवार आले आहेत. मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण करुन आढावा बैठकीला सुरुवात झाली. मंत्री अतुल सावे आणि संदीपान भुमरे या बैठकीला उपस्थित आहेत.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी निधी खर्च झाला नसल्याने अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. “पैसे मिळूनही निधी खर्च केला जात नाही, एका महिन्यात सगळा निधी खर्च करू नका, कामे व्यवस्थित करा” अशी अजित पवार यांनी सूचना केली. “पाणी पुरवठा व्यतिरिक्त अन्य कामे आचारसंहिता लागल्यावर थांबतील. प्रशासकीय मान्यता इतर मान्यता लवकर घ्या, निवडणुक आचारसंहिता पुर्वी कामे सुरु करा” असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन

या बैठकीला Pwd विभागाचे चीफ इंजिनियर न आल्याने अजित पवार यांनी झापले. “आम्ही इथे माशा मारायला आलो आहोत का?. बैठकीला यायला चीफ इंजिनिअर यांना अडचण होते का? अधिकाऱ्यांना मस्ती आली आहे का? मी असला निष्काळजीपणा खपवून घेणार नाही, तात्काळ बोलवून घ्या” असे आदेश अजित पवार यांनी दिले. पडेगाव पोलिस फायरिंग रेंज व वन विभाग यांची जागा संयुक्त मोजणी करुन हद्दी कायम कराव्यात, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना आदेश दिले. अजित पवार संतापले, त्यांनी अधिकाऱ्यांना झापलं. संभाजीनगर येथील नियोजन समिती सभागृहाची दुरावस्था, काही ठिकाणी फर्निचर तुटलेलं आहे. तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.

स्वातंत्र्याला ७५ वर्ष झाली तरी आपण शाळेत विद्यार्थ्यांना चांगल्या वर्ग खोल्या देऊ शकलो नाही, म्हणून अजित पवार यांनी व्यक्त केली नाराजी. शाळा खोली बांधण्यासाठी दानशूर व्यक्ती, CSRची मदत घ्या असा सल्ला अजित पवारांनी दिला. पालकमंत्री यांना DV कारसाठी इनोव्हा क्रिस्ट गाडी घ्यायला निधी दिला असं अजित पवार म्हणाले. त्यावर संदीपान भुमरे म्हणाले की ‘गाडी आली मात्र मला माहिती नाही, मला अधिकाऱ्यांनी सांगितलच नाही’

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button