breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

प्रिमियम ट्रान्समिशनमध्ये वेतनवाढ कराराला मंजुरी

पिंपरी । प्रतिनिधी

चिंचवड येथील प्रिमियम ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये व्यवस्थापन व ग्रिव्हज कॉटन ऑन्ड अलाईड कंपनीज एन्प्लॉईज युनियन यांच्या दरम्यान वेतनवाढ करार करण्यात आला. यामुळे कामगारांना १८,९०० रुपये वेतनवाढ मिळणार आहे. कराराचा कालावधी १ जुलै २०२१ ते ३०) जून २०२४ असा तीन वर्षांचा असणार आहे. या करारानुसार पहिल्या वर्षी रुपये ५३०० रुपये, दुसऱ्या वर्षी रुपये ६३०० रुपये तर तिसऱ्या वर्षी ७३०० रुपये तर बोनसमध्ये प्रतिमहा २०० रुपये वाढ लागू केली जाणार आहे.

या करारावर व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे सरव्यवस्थापक महेश रंगोले, उत्पादन प्रकल्पप्रमुख प्रविण फिरके, मनुष्यबळ उपसरव्यवस्थापक जयंत हर्षे यांनी तर कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष डॉ. भालचंद्र कानगो, उपाध्यक्ष कॉ. एस डी. गोडसे, कॉ. शाम सुळके, सचिव माधव रोहम, सहसचिव कॉ. तानाजी खराडे, वाटाघाटी सदस्य कॉ. एल. एस. मारू, कॉ. नितिन आकोटकर, कॉ. अजय गायकवाड, कॉ. श्रीकांत गोडसे, कॉ. के. के. पेडणेकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या. करोनाच्या जागतिक महामारी व मंदी असतानाही वेतनवाढ करार झाल्यामुळे कामगारांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. सर्व कामगारांनी कंपनी प्रवेशद्वारावर फटाके व गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button