breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

‘देशाची बदनामी करणे ही राहुल गांधींची सवय आहे’; अनुराग ठाकुर यांचे गांधींना प्रत्युत्तर

आपल्याला जबरदस्त पंतप्रधान मिळाले आहेत

दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनस्थित केंब्रिज विद्यापीठात आपल्या भाषणात पेगासस प्रकरणावरून मोदी सरकारवर टीका केली. यावरून आता केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं आहे.

भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. विक्रमी पातळीवर परदेशी गुंतवणूक भारतात येत आहे. राहुल गांधी मीडियाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढेच नाही तर देशाच्या संवैधानिक संस्था आणि न्यायपालिकेची बदनामी करण्याची आणि नंतर कोर्टाची माफी मागण्याची एकही संधी ते सोडत नाहीत, असं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर म्हणाले.

परदेशात पंतप्रधान आणि देशाची बदनामी करणे ही राहुल गांधींची सवय झाली आहे. कधी ते स्वतः करतात, तर कधी ते त्यांच्या परदेशी मित्रांना बदनामी करायला लावतात. प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसची धुलाई-स्वच्छता होत आहे. देशात कुणी विचारत नाही त्यामुळे ते परदेशात जाऊन खोटं बोलत आहेत. कोर्ट-संसदेत ते माफी मागतात. ते जामीनावर सुटलेले आहेत. आपल्याला जबरदस्त पंतप्रधान मिळाले आहेत की जे महिला, मजूर, गरीब यांच्या हिताचा विचार करतात. जो परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणतो. आपत्तीत इतर देशांना मदत करतो असा हा सशक्त भारत आहे, असं अनुराग ठाकुर म्हणाले.

राहुल गांधी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदनामी करण्याचं काम करत आहेत. पेगासस खरंतर त्यांच्या डोक्यातच आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात जगभरात भारताचा सन्मान केला जात आहे. दिग्गज नेते मोदींचं कौतुक करत आहेत. राहुल गांधींनी कमीतकमी इटलीच्या पंतप्रधानांचं म्हणणं तरी ऐकायला हवं होतं, असंही अनुराग ठाकुर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button