breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

केतकी चितळेची अजुन एक वादग्स्त पोस्ट; म्हणाली, तयास मानव म्हणावे का…?

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे तिच्या अभिनयापेक्षा बेधडक वक्तव्यांसाठी अधिक प्रसिद्ध आहे. केतकी सोशल मीडियावरही तिची मतं परखडपणे मांडत असते. काही दिवसांपुर्वीच तिने नवीन वर्षाच्या निमित्ताने एक सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे. तिच्या या पोस्टमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या व्हिडीओवर अनेकांनी तिला चांगलीच खरी खोटी सुनावलं होतं. तरी देखील तिने आज सावित्रिबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिची पोस्ट वेगळ्याच कारणासाठी व्हायरल होत आहे.
केतकीने आपल्या या पोस्टमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्या आपले प्रेरणास्थान असल्याचं म्हटलं आहे. त्यात ‘तयास मानव म्हणावे का…?’ ही सावित्रीबाईंची कविता ऐकवली आहे. या कवितेमुळे, सावित्रीबाईंच्या जीवनातून आपल्याला रोज प्रेरणा मिळते, असं तीने म्हटलं आहे.
सावित्रीबाईंवर तर प्रत्यक्ष शेण फेकलं गेलं होतं, माझ्यावर तर फक्त शाब्दिक शेण फेकण्यात येत आहे. जर त्या सगळं सहन करत आपलं कार्य करत राहील्या तर मी पण उभं राहूच शकते. शिवाय या कवितेवरून प्रेरणा घेत तिने स्वतः लिहीलेल्या चारओळी ऐकवत पुन्हा ‘तयास मानव म्हणावे का?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे.
यापुर्वी, केतकीने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रात्री १२ च्या सुमारास इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत तिने तिच्या हातावर गोंदलेला एक टॅटू दिसत आहे. हा टॉटू वरील नंबर ती जेल मध्ये असतानाचा असल्याचं बोललं जात आहे. त्याबरोबरच तिच्या हातात दारुचा एक ग्लासही पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये असंही लिहिलं की, “मैं कट्टर सनातन हिन्दू हूँ लेकिन इसका मतलब यह नहीं की बाकी सब १००% गलत है।”. तिच्या हातातील दारुचा ग्लास पाहून नेटकरी तिच्यावर चांगलेच संतापले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button