breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

पुणे |

आपल्यावर जीवघेणा हल्ला केलेल्याची सुपारी देऊन पिस्तुले पुरविलेल्या व मोक्काअंतर्गत कारवाई केलेल्या भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. या प्रकरणी अकबर पिरसाब शेख (वय 35, रा. पानसरेनगर, येवलेवाडी) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विवेक यादव व त्याच्या ८ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार कॅम्पमधील जान मोहम्मद स्ट्रीटवरील 15 ऑगस्ट चौकाजवळील कणसे गॅरेजसमोर 9 जानेवारी 2020 रोजी घडला होता. अकबर शेख हा मोटारसायकलवरुन जात असताना आरोपी हे मोटारसायकलवरुन आले. त्यांनी त्यांची मोटारसायकल आडवी लावून शेख याला थांबायला भाग पाडले. विवेक यादव याने त्यांना शिवीगाळ करुन कंबरेला असलेला कोयता दाखवून तुला लय मस्ती आली आहे काय परत, विवेक भाईचे विरोधात अर्ज केला तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. याबाबत फिर्यादी यांनी लष्कर पोलीस ठाणे व पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार अर्ज केला होता. या अर्जाच्या अनुषंगाने पोलिसांनी फिर्यादी व आरोपी यांना समोरासमोर बोलावले होते. त्यामुळे आरोपीसमोर येण्यास घाबरल्यामुळे ते आले नाही व त्यांनी तक्रार दिली नव्हती. आता पोलिसांनी कारवाई केल्यानंतर ते तक्रार देण्यास पुढे आले.

विवेक यादव याच्यावर 2016 मधील गणेश विसर्जन मिरवणुकीत बबलु गवळी याने गोळीबार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला होता. याचा बदला घेण्यासाठी शिक्षा भोगत असलेला व कोरोनामुळे कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या राजन राजमणी व त्याचा साथीदार इब्राहिम शेख यांना विवेक यादव याने बबलु गवळी यांची सुपारी दिली होती. त्यासाठी त्याने या दोघांना 3 पिस्तुले व 7 काडतुसे पुरविली होती. कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे व त्यांच्या पथकाने शस्त्रे बाळगल्याप्रकरणी या दोघांना पकडले होते. त्यांच्याकडील मोबाईलमधील व्हॉटसअ‍ॅपवरील संभाषणावरुन खुनाची सुपारी दिल्याचा हा कट उघडकीस आला होता. त्यानंतर फरार झालेल्या विवेक यादव याला गुजरात -राजस्थान सीमेवरुन पोलिसांनी पकडले होते. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशावरुन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button