breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

…अन् पोलिसांनीच फाडलं मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे फोटो असलेलं पोस्टर

Shaktipith Mahamarg : नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग बांधण्याचे काम हाती घेतले असून यासाठी 27 हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध वाढत असून शक्तिपीठ महामार्ग तत्काळ रदद करण्याची मागणी शेतकऱ्यांसह महायुतीच्याच नेत्यांकडून केली जात आहे.

अशात आता मोठी बातमी समोर आली आहे. मिळलेल्या माहितीनुसार, शक्तिपीठ महामार्ग विरोधी आंदोलनात पोलिसांनीच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे फोटो असलेलं पोस्टर फाडलं आहे. ही घटना कोल्हापूरच्या माणगाव येथे घडली आहे.

मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर दौरा रद्द केल्याने माणगावमधील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला निवेदन देण्याचे आंदोलन केलं होतं. आंदोलनासाठी आणलेलं पोस्टर पोलिसांनी आंदोलनाआधीच फाडलं. निरीक्षक अशोक सायकर यांनी पोस्टर फाडलंय. असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा   –   महिला-केंद्रित ग्रामविकासांतर्गत “दृष्टा” डिजिटल फॅशन डिझाईन प्रकल्पाचे आयोजन 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात महायुतीला मोठा फटका बसला. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा तीच पुनरावृत्ती होऊ नये, शेतकऱ्यांचा रोष नको म्हणून सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी या महामार्गाच्या विरोधात आहेत.

तत्पूर्वी,कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजप नेते समरजित घाटगे यांनीही शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 6 सहा तालुक्यातील शेतजमीन शक्तीपीठ महामार्गासाठी जाणार आहे. भुदरगड तालुक्यातील 21, आजरा तालुक्यातील 5, शिरोळ तालुक्यातील 5, हातकणंगले तालुक्यातील 5 करवीर तालुक्यातील 10 व कागल तालुक्यातील 13 गावातून शक्तिपीठ महामार्ग जात आहे.

कोल्‍हापूर जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. या शेतकऱ्यांच्या अल्प प्रमाणात असणाऱ्या जमिनी शक्तिपीठ महामार्गामध्ये गेल्यास शेतकऱ्यांना उपजिवीकेसाठी जमिन शिल्लक रहाणार नाही, त्यामुळे शेकऱ्यांमध्ये या शक्तिपीठ महामार्गाला प्रचंड विरोध दर्शविण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button