breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

अनंत अंबानीचा राधिका मर्चंटशी झाला साखरपुडा

साखरपुड्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची देखील उपस्थित

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या साखरपुड्यानिमित्त अंबानी कुटुंबाचे मुंबईतील अँटिलिया हे निवासस्थान सजले होते. अनंत अंबानीचा साखरपुडा राधिका मर्चंटशी झाला आहे. अंबानींच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी त्या अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पार पडला. त्यांच्या साखरपुड्यासाठी अतिशय जय्यत तयारी करण्यात आली होती. अगदी राजेशाही थाटात त्या दोघांचा साखरपुडा पार पडला. गेले काही दिवस राधिकाच्या मेहंदीचे फोटोही समोर आले होते.

राधिका ही एनकोर हेल्थकेअरचे सीईओ बिरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. राधिका मर्चंटचा जन्म १६ डिसेंबर १९९४ रोजी झाला. ती आता २८ वर्षांची आहे. राधिका मर्चंटने न्यूयॉर्क विद्यापीठातून राजकारण आणि अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे.

या सोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. सलमान खान, रणवीर सिंग, दीपिका पादुकोन, ऐश्वर्या रॉय, वरूण धवन, जानवी कपूर, जॉन अब्राहम, गौरी खान हे सेलिब्रिटी उपस्थित होते. यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button