पिंपरी / चिंचवड

थेरगाव येथे वृद्ध दाम्पत्यास आठ जणांकडून मारहाण

पिंपरी l प्रतिनिधी

घरावर दगड मारल्याच्या संशयावरून आठ जणांनी मिळून वृद्ध दाम्पत्यास मारहाण केली. तसेच महिलेचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 14) दुपारी साडेबारा वाजता थेरगाव येथे घडली.

लक्ष्मण साठे, संजय लक्ष्मण साठे, ओंकार साठे, सुमित रणजित साठे (वय 48), रणजित लक्ष्मण साठे (वय 48), कौशल्या साठे, मीना संजय साठे, आरती संजय साठे (सर्व रा. थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 62 वर्षीय व्यक्तीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या घरावर काहीतरी पडल्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांच्या पत्नीला आणि मुलाला शिवीगाळ केली. फिर्यादी तिथे गेले असता आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांच्या पत्नीचा विनयभंग केला. मीना आणि आरती साठे यांनी फिर्यादी यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे डोरले तोडून नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button