breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

अरे झाकणझुल्या तू कसला वारकरी? मिटकरींचा तुषार भोसलेंना टोला

भाषणाच्या ओघात आडनाव चुकले तर एवढा तिळपापड कशाला
पुणे : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा चुकीचा उल्लेख केला. अजित पवार यांनी बोलण्याच्या ओघात सावित्रीबाई होळकर असा उल्लेख केला. चूक लक्षात येताच त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली. यावरून भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी अजित पवारांवर टिका केली. या पारश्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
शाळीग्राम नावाच्या माकडाने आता दिवसापण गांजा मारायला सुरुवात केलीय. हा व्यक्ती कोणत्या पंथाचा आहे हे लवकरच उघडे करू. अरे झाकणझुल्या अजितदादांकडून ओघवत्या भाषणात आडनाव चुकले तर एवढा तिळपापड कशाला करतो, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी तुषार भोसले यांच्यावर केली आहे.
तुझ्यामध्ये वारकरी असण्याचे कोणते लक्षण आहेत. कोणत्या मठामध्ये या व्यक्तीच्या पाठीवर लाथ घालून बाहेर काढण्यात आला याचा व्हिडीओ आपल्याकडे असल्याचंही अमोल मिटकरी म्हणाले.
सोबतच, अजित पवार आता तरी माफी मागणार की आपल्या बोलण्यावर ठाम राहणार आहेत. त्यांनी त्यांच्या चुकीच्या वक्तव्याबद्दल माफी मागायला हवी, अशी मागणी तुषार भोसले यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button