breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

सत्यपाल मलिकांच्या आरोपांवर अमित शाहांचे प्रत्युत्तर; म्हणाले,..

दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारच्या बेजबाबदारपाणमुले पुलवामा हल्ला झाला, असा आरोप केले होते. त्यांच्या या आरोपानंतर देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, मलिकांच्या आरोपानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमित शाह म्हणाले की, सत्यपाल मलिकांना राज्यपाल पदावरून पायउतार झाल्यानंतरच या सर्व गोष्टी का आठवत आहेत? आणि त्यांना केलेले आरोप खरे असतील तर राज्यपाल पदावर असताना ते या विषयावर का बोलले नाही? याचा विचार आता जनतेने आणि माध्यमांनी करावा. खरं तर लोक जेव्हा सत्तेत असतात तेव्हा अनेकदा त्यांचा विवेक जागा होत नाही.

भाजपा सरकारला देशातील जनतेपासून काही लपवावे लागेल, असं कोणतंही कृत्य आम्ही केलेलं नाही. जर एखादी व्यक्ती राजकीय स्वार्थासाठी आमच्या विचारांशी दूर जाऊन आमच्यावरच आरोप करत असेल तर माध्यम आणि जनचेनेचे याचा विचार केला पाहिजे, असं अमित शाह म्हणाले.

पुलवामा हल्ल्यापूर्वी सीआरपीएफनं एअरक्राफ्टची मागणी केली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने नकार दिला. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी मी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. पुलवामा हल्ला आपल्या चुकीमुळे घडलाय असं मी त्यांना सांगितलं. पण त्यांनी मला शांत राहण्यास सांगितलं, असा आरोप सत्यपाल मलिक यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button