breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘‘लहरायेगा तिरंगा’’ देशभक्तीपर गीताच्या रील स्पर्धेमध्ये अमन मासीने प्रथम क्रमांक पटकावला!

देशभरातील १५० कलाकारांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला

पिंपरी: स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सव निमित्ताने लहरायेगा तिरंगा या देशभक्तीपर गीतावर रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये देशभरातील १५० कलाकारांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. उत्तर प्रदेश या राज्यातील अमन मासी ने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सामाजिक विषयावर लघुपट निर्मिती करून समाज प्रबोधनाचे काम करणाऱ्या करणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील रेडबड मोशन पिक्चर्स या संस्थेच्या वतीने स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सव निमित्ताने लहरायेगा तिरंगा या शाळाबाह्य मुले, ऊसतोड कामगार, बाल मजदूर या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी लहरायेगा तिरंगा या गाण्याची निर्मिती नुकतीच करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या गाण्याची दखल घेत या गाण्याची निर्मिती करणारे दिग्दर्शक सीए अरविंद भोसले यांना पत्र लिहून विशेष कौतुक देखील केलेले आहे.

या देशभक्तीपर लहरायेगा तिरंगा गीतावर रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये देशभरातील १५० कलाकारांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत उत्तर प्रदेश येथील अमन मासी यांच्या ग्रुपने प्रथम पटकावत ११,१११ रोख रकमेचे पारितोषिक व स्मृतिचिन्ह पटकावले आहे. द्वितीय क्रमांक नवी दिल्ली येथील संजय मौर्या आणि टीम यांनी ७,७७७ रोख रक्कम व स्मृतिचिन्ह  पटकाविले आहे. तृतीय पारितोषिक पंजाब येथील अनाया खन्ना हिने ५,५५५ व स्मृतिचिन्ह पटकाविले आहे. सर्वात जास्त लाईक मिळवणाऱ्या नवी दिल्ली येथील आकाश व  इतर सह कलाकार यांना विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

बालकलाकारांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव…

चिंचवड येथील पैस कला रंगमंच येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विजेत्यांची घोषणा करण्यात आली. तसेच या गाण्या मध्ये काम करणाऱ्या बालकलाकारांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याचे अभ्यासक प्रा. सपंत गर्जे, डॉ नितीन लोंढे, ग्रुज एन्टरप्राइजेस चे व्यवस्थापक प्रदीप पाटील, एस पी इंटरनॅशनल चे व्यवस्थापक पांडुरंग देशमुख, बोल्ट इंनोव्हेट चे संचालक सुनील कापसे, पल्लवी कापसे, दिग्दर्शक सीए अरविंद भोसले, झील या संस्थेचे श्रेयश देशपांडे, एपीएच संचालिका अभिनेत्री प्रज्ञा पाटील, अभिनेते रोहित पवार, वाको इंडिया किक बॉक्सिंग चे सेक्रेटरी संतोष म्हात्रे, व्यंगचित्रकार गणेश भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button