ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

शरद पवारांच्या दौर्‍याने अमरावतीत हायअलर्ट, ४ जिल्ह्यांतून अतिरिक्त पोलिस बळ तैनात

अमरावती| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे आज अमरावती जिल्ह्याच्या ) दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर झालेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रामनवमीनिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी मिरवणूक शोभायात्रा निघणार आहे. तसेच आज अमरावती येथे संवाद बैठकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे अनेक मंत्री महत्त्वाचे नेते आणि खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार असल्याने पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

आज दोन पद्धतीचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रामनवमी शोभायात्रा आणि शरद पवार यांच्या दौऱ्यामुळे अकोला, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर व नागपूर येथील अतिरिक्त पोलिस बळ अमरावती शहरात बोलवण्यात आले आहे. पोलिस त्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे, अशी माहिती गाडगेनगर पोलिस ठाण्याचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button