TOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

चक्क ऐश्वर्याच्या लेकीची सलमान खानलाच ‘पा’ म्हणून हाक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्या फक्त तिच्या सुंदरतेसाठी नाही तर अभिनयासाठी देखील ओळखली जाते. करिअरच्या सुरुवातीपासून ऐश्वर्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होती. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि ऐश्वर्याच्या रिलेशनशिपबद्दल तर सगळ्यांनाच माहित आहे.

फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार्सच्या यादीत सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नावाचा समावेश आहे. हे दोघं केवळ त्यांच्या चित्रपटांसाठीच नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही ओळखले जातात. आज आम्‍ही तुम्‍हाला सलमान खान आणि ऐश्‍वर्या रायच्‍या आयुष्‍याशी संबंधित एका अशा  घटनेबद्दल सांगणार आहोत, ज्याने त्‍यांच्‍या लव्‍ह लाइफमध्‍ये खळबळ उडवून दिली होती

सलमान आणि ऐशची लव्हस्टोरी 1997 मध्ये सुरु झाली होती. त्यावेळी सलमान सुपरस्टार झाला होता तर दुसरीकडे ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. ऐश्वर्याआधी सलमान खान सोमी अलीच्या प्रेमात होता.

सध्या, यूट्यूबवर एक व्हिडिओ रिपोर्ट मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, आराध्याने एका पुरस्कार कार्यक्रमात सलमानला ‘पा’ म्हणून हाक मारली. मात्र, या घटनेशी संबंधित कोणताही व्हिडिओ सध्या उपलब्ध नाही.

व्हिडिओ रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की ही घटना फिल्मफेअर अवॉर्ड्स दरम्यान घडली, जेव्हा आराध्या बच्चनला बेस्ट डेब्यू अवॉर्ड घेण्यासाठी मंचावर पोहोचली. पहिल्या रांगेत बसलेले अभिषेक आणि ऐश्वर्या आपल्या मुलीसाठी टाळ्या वाजवत होते. पण त्यानंतर सलमान जेव्हा ऐशच्या मुलीला पुरस्कार देण्यासाठी पोहोचला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. यावेळी पुरस्कार स्वीकारल्यानंतर आराध्याने सलमानला ‘थँक्स पा’ म्हटलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर एवढा व्हायरल झाला होता की, सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button