breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

हेमंत रासनेनंतर रवींद्र धंगेकर आणि रूपाली ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

हेमंत रासने यांच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीचे मतदान काल पार पडले. मतदान पार पडेपर्यंत आणि मतदान संपेपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासह काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर भाजपचे कसब्याचे उमेदवार हेमंत रासने यांनी मतदानाला जाताना गळ्यात भाजपचं उपरणं घातलं होतं. कमळाचं चिन्ह असलेलं हे उपरणं घालूनच त्यांनी मतदान केंद्रात प्रवेश केला आणि मतदान करून बाहेर पडले. या प्रकरणी रासने यांच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्त्रेहा विसवे यांनी सांगितले की, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि राष्ट्रवादीच्या रूपाली ठोंबरे यांनी आचारसंहितेचा भंग केल्याच्या तक्रारी प्रप्त झाल्या आहेत. त्यांची दखल घेऊन कारवाई करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button