Uncategorizedताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रिय

वकील संरक्षण कायद्यासह विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

पिंपरी-चिंचवड नोबल अॅडव्होकेटस् ट्रस्टचा पुढाकार

पिंपरीः वकील तसेच नोटरी यांच्यावर खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल होणे व वकीलांवरील हल्ले रोखण्याकरिता वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर करावा या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना नोबल अॅडव्होकेटस् ट्रस्टने निवेदनाद्वारे साकडे घातले.

सदर निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी, नेहरूनगर येथील नव्याने स्थलांतरीत केलेल्या इमारतीमध्ये एकूण ११ न्यायालये तयार आहेत. त्यामुळे वरिष्ठ दिवाणी न्यायालय व सेशन कोर्टकरिता कर्मचारी लवकरात लवकर मिळाल्यास वरिष्ठ दिवाणी न्यायालय व सेशन कोर्ट सुरू होईल. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या दाखल केसेसचा निपटारा अधिक जलदगतीने व जास्त प्रमाणावर होण्यास मदत होईल. याचा लाभ पिंपरी-चिंचवड शहरातील पक्षकारांना होणार आहे. तसेच वकील, पक्षकार व पोलीस यांच्यावरील शिवाजीनगर येथील मे सेशन न्यायालयात ये-जा करण्यात लागणारा वेळ, आर्थिक व मानिसिक त्रासाची बचत होणार आहे.

महाराष्ट्रात सुमारे २ लाख नवोदित वकीलांची संख्या आहे. प्रत्येक वर्षी नविन वकीलांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. मात्र नविन वकीलांना सुरूवातीचे ५ वर्षे काही एक मिळत नाही. नविन वकीलांना कुटुंबाचे उदरनिवाह व पालनपोषणकरिता आर्थिक अडचण निर्माण होत आहेत. त्यामुळे वकील वकीली व्यवसाय करण्यापासून दुर होताना दिसत आहेत. असे सुरू राहिले तर न्यायदान प्रकीयेत वकीलांचा सहभाग कमी होण्याची दाट शक्यता आहे.

तिनही मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन
याकरिता नविन वकीलांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरूवातीचे ५ वर्षे दरमहा र.रू. २५,०००/- (अक्षरी र.रू. पंचवीस हजार फक्त) आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. असे झाल्यास चांगल्या गुणवत्तेचे वकीलांची सख्या वाढून न्यायालयीन कामकाज प्रक्रियेत नविन वकीलांचा सहभाग हा वाढून जलदगतीने न्यायालयीन कामकाज प्रक्रिया शाश्वत उत्पन्न होण्यास मदत होईल. नोबल अॅडव्होकेटस् ट्रस्टचे वतीने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना लेखी निवेदन देण्यात आले. सदरचे निवेदन स्विकारताना तीन विषयांवर चर्चा केली, आणि तीनही मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

निवेदन देण्यासाठी यांची उपस्थिती…
यावेळी नोबल अॅडव्होकेटस् ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. राजू माधवन, कार्याध्यक्ष अॅड. सुशिल मंचरकर,अॅड. सारिका परदेशी, अॅड. संगिता परब, अॅड. दत्ता झुळूक, अॅड. महेश वाकळे, अॅड. अंकुश गोयल, अॅड. मेरी रणभिसे, अॅड. गजेंद्र तायडे, अॅड. सुरेंद्र शर्मा, अॅड. संतोष मोरे, अॅड. सी. एम.माने, अॅड. गावकर, अॅड. कांता गोरडे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button