breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

अभिनेता सुशांतसिंह राजपुतची आत्महत्या नाही तर हत्याच, रुग्णालयातल्या कर्मचाऱ्याचा दावा.. 

कूपर रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या दाव्याने खळबळ..

मुंबई :

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या नाही तर हत्या करण्यात आली असल्याचा दावा कुपर हॉस्पिटलमधील कर्मचार्‍याने केला आहे. रुपकुमार शाह असं त्या कर्मचाऱ्याच नाव आहे.

जेव्हा सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला तेव्हा त्याचं पोस्टमार्टम करण्यासाठी त्याला कूपर रुग्णालयात आणण्यात आलं. त्या वेळेस कूपरमध्ये 5 बॉडी पोस्टमार्टमसाठी आणण्यात आल्या होत्या. त्यातील एक VIP डेड बॉडी होती.

आम्ही पोस्टमार्टमसाठी गेलो तेव्हा आम्हाला कळलं की, बॉडी सुशांत सिंह राजपूतची आहे. त्यांच्या शरिरावर अनेक खुणा होत्या. मानेवरही 2-3 ठिकाणी जखमांच्या खुणा होत्या. पोस्टमार्टमचं रेकॉर्डिंग करायला हवी होती. पण उच्च अधिकाऱ्यांकडून आम्हाला केवळ बॉडीचे फोटो काढायला सांगितले. आम्ही तेव्हा जे काही केलं ते त्यांच्या आदेशानुसार केलं, असा दावा रुपकुमार यांनी केला आहे. आम्ही जेव्हा सुशांतची डेड बॉडी पाहिली तेव्हा आमच्या सिनीअर्सना लगेच सांगितलं की, ही आत्महत्या नसून ही हत्या आहे. आपल्याला नियमांनुसार करावं लागेल, असंही मी सांगितलं पण माझ्या सिनीअर्सनी मला बॉडीचे फोटो काढून लवकरात लवकर बॉडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात सांगितलं. त्यामुळेच आम्ही सुशांतचं पोस्टमार्टम रात्री केलं होतं, असंही म्हणाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button