breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपीने न्यायालयाकडे मागितला अंतरिम जामीन!; कारण…!

पुणे |

भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी असलेल्या रोना विल्ससनने अंतरिम जामिनासाठी एनआयएच्या विशेष न्यायालायत याचिका दाखल केली आहे. वडिलांच्या निधनानंतर ३० दिवसांनी कुटुंबीयांनी आयोजित केल्या शोकसभेला उपस्थित राहण्याासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यासाठी रोना विल्सनने वकील आर सत्यनारायण आणि नीरज यादव यांच्या माध्यमातून बुधवारी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. १६ सप्टेंबरला शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी विल्सनने १३ सप्टेंबरपासून दोन आठवड्यांचा जामीन द्यावा, असं अर्ज केला आहे. मानवी मूल्यांचा विचार करून जामीनासाठी प्रार्थना करण्यात आली आहे. कुटुंबातील सदस्यांना भेटण्याची आणि शोकसभेत सहभागी होण्याची विनंती करण्यात आली आहे.

रोना विल्सनला जून २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती. कोरेगाव भीमा प्रकरणात कथिद सहभागाप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सध्या नवी मुंबईतील तलोजा तुरुंगात आहे. रोना विल्सनच्या वडिलांचं निधन १८ ऑगस्ट २०२१ रोजी केरळमध्ये झालं होतं. रितीनुसार त्याच्यांवर १९ ऑगस्टला अंत्यविधी पार पडला होता. रोना विल्सनच्या अर्जानतर विशेष न्यायाधीस डी ई कोथळीकर यांनी एएनआयला म्हणणं मांडण्यास सांगितलं आहे. तसेच या अर्जावर पुढील सुनावणी ६ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button