Uncategorizedताज्या घडामोडीविदर्भ

अपघातसत्र सुरुच, गंगाखेड परळी रोडवरील करम पाटील जवळ बस आणि ट्रॅव्हल्स चा अपघात होऊन जवळपास २५ जण जखमी

परभणी: गंगाखेड परळी रोडवरील करम पाटील जवळ बस आणि ट्रॅव्हल्स चा अपघात होऊन जवळपास २५ जण जखमी झाल्याची घटना आज गुरुवार 28 जुलै रोजी रात्री घडली आहे. जखमींवर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड अंबाजोगाई आणि परभणी येथे पाठवण्यात आले आहे. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश मूलुरवार यांनी दिली आहे.

गंगाखेड परळी रोडवरील करम पाटील जवळ नांदेडहून पुण्याकडे जाणाऱ्या माऊली ट्रॅव्हल्स आणि बस मध्ये अपघात झाला आहे. या अपघातामध्ये बस आणि ट्रॅव्हल्स मधील जवळपास २५ जण जखमी झाली आहेत. जखमींना रात्री अकरा वाजेपर्यंत गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनास्थळी गंगाखेड आणि सोनपेठ पोलीस पोहोचले आहेत.

अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींवर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड, अंबाजोगाई आणि परभणी येथे हलवण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास दहा जणांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही. रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यात येत आहेत.

हा भीषण अपघात घडण्याची माहिती मिळतात गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये नागरिकांनी एकच गर्दी केली होती. तसेच जखमी व्यक्तींवर उपचार करण्यासाठी आणि त्यांना पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी मदत केल्याचे चित्र यावेळी पहावयास मिळाले. घटनेची माहिती मिळतात गंगाखेड पोलिसांनी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये धाव घेतली आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

उपचारासाठी चार पथके तयार

परळी गंगाखेड रोड वर बस आणि ट्रॅव्हलच्या अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींवर उपचार करण्यासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये चार पदके तैनात करण्यात आली आहेत. या पथकाकडून कडून जखमींवर उपचार केले जात आहे. दरम्यान अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींची संख्या वाढणार असल्याची शक्यता गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button