TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्तनाशकात अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन

मुंबई: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांचा दि.१५ ऑक्टोबर २०२२ रोजी ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने नाशिक शहरातील भुजबळ फार्म येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती छगन भुजबळ गौरव समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

छगन भुजबळ गौरव विकास समितीच्या वतीने छगन भुजबळ यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस वर्षभर विविध सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानिमित्ताने दि.१५ ऑक्टोबर २०२२ रोजी नाशिक भुजबळ फार्म येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी छगन भुजबळ हे सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत राज्यभरातील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.

छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने दि.१५ ऑक्टोबर २०२२ पासून पुढील वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये महापुरुषांच्या पुस्तकांचे व प्रतिमांचे वाटप, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, अंध अपंगाना वस्तूंचे वाटप, शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीर, वत्कृत्व, रांगोळी, निबंध यासह विविध स्पर्धांचे आयोजन तसेच महापुरुषांवर व्याख्याने व विविध शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती छगन भुजबळ गौरव समितीच्या देण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button