TOP Newsताज्या घडामोडीविदर्भ

माजी नगरसेवकाच्या पुतण्याचे अपहरण ; ३० लाखांची खंडणीची मागणी

नागपूर : नागपुरातील एका नामांकित शाळेच्या मुख्याध्यापकाचे अज्ञात आरोपींनी अपहरण करून त्यांच्या पत्नीला ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास जरीपटक्यात घडली. गणपती उत्सवामुळे प्रत्येक चौकात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना आरोपींनी अपहरण केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रदीप मोतीराम रामानी (जरीपटका) असे अपहृत मुख्याध्यापकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप रामानी हे माजी नगरसेवक जग्यासी यांचे पुतणे आहेत. ते नागपुरातील एका नामांकित शाळेचे मुख्याध्यापक आहेत. त्यांनी शुक्रवारी रात्री १० वाजून ७ मिनिटांनी पत्नीला फोन करून घरी येत असल्याचे सांगितले. परंतु, ते बराच वेळ होऊनही घरी न आल्याने पत्नीला संशय आला. त्यानंतर पतीचा फोनही बंद येत होता. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिली.

त्यांची शोधशोध करीत असतानाच त्यांच्या पत्नीला फोन आला. अपहरणकर्त्यांनी ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यामुळे रामानी कुटुंबीय घाबरले. त्यांनी लगेच जरीपटका पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सायबर पोलिसांच्या मदतीने सूत्रे हलवली. अद्याप अपहरणकर्त्यांचा कोणताही सुगावा लागला नाही. पोलिसांनी तीन पथके तयार केली आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button