breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
‘आप’चे खासदार संजय सिंह यांच्या सरकारी घरावर हल्ला; दोघांना अटक
नवी दिल्ली- उच्च सुरक्षा व्यवस्था असलेल्या नॉर्थ एव्हेन्यू भागातील आपचे खासदार संजय सिंह यांच्या सरकारी निवासस्थानावर आज हल्ला झाला. त्यात हल्लेखोराने त्यांच्या घराची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मात्र त्यांची नावे जाहीर केलेली नाहीत.
आयोध्याच्या राम मंदिर जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला होता. त्यानंतर आज त्यांच्या सरकारी घरावर हल्ला झाला. या हल्लेखोरानी घराची तोडफोड केली. त्यामुळे या घटनेचा कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांशी काही संबंध आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.