breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मिशन-२०२२ : भाजपाच्या चुकीच्या कामा विरोधात आवाज उठवा : संजोग वाघेरे-पाटील

पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत पालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आणण्याचे आमचे ध्येय आहे. यासाठी सर्वजण एकत्रितपणे भाजपाच्या चुकीच्या कामा विरोधात आवाज उठवायचा आहे, असे आवाहन शहराध्यक्ष संजोग वाघेरे- पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सेलच्या अध्यक्षांची (दि.18) शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी बैठक घेतली. या बैठकीत संघटनात्मक बांधणी, बूथ कमिटी व एकुणच शहरातील येत्या महापालिकेच्या निवडणूकासमोर ठेवत भविष्यातील पक्षाची शहराची वाटचाल या सर्व गोष्टींवर सकारात्मक चर्चा झाली. समवेत सर्व सेल अध्यक्ष उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना वाघेरे- पाटील म्हणाले की, भाजपाने सत्तेवर येताना भय आणि भ्रष्टाचार मुक्त कारभाराची घोषणा केली होती; आज मात्र भाजप भयही दाखवत आहे आणि भ्रष्टाचारही करत आहे. महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने शहरातील जनतेला मोठमोठी स्वप्न दाखवली; मात्र त्याची पूर्तता केली नाही. भाजपाने त्यावेळी जो अजेंडा प्रसिद्ध केला, त्यातील एकाही बाबीची पूर्तता झाली नाही. आता हा एकेक मुद्दा घेऊन आपल्याला जनतेसमोर जायचे आहे भाजपच्या या खोट्या अजेंड्याची चिरफाड आपल्याला करायची आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत भाजपच्या विरोधात आवाज उठवायचा आहे .जनतेसमोर भाजपच्या चुकीच्या कामांना घेऊन जायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

https://www.facebook.com/620514291470172/posts/1782488088606114/

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button