ताज्या घडामोडीमनोरंजन

“आमिर खान अतिशय फालतू…”; बॉयकॉट ‘लाल सिंग चड्ढा’ मोहिमेचं समर्थन करत संतापले मुकेश खन्ना

मुकेश खन्ना यांनी चित्रपटावरील बहिष्काराचे समर्थन केले आहे.

आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाविरोधात बॉयकॉट मोहिम राबवली गेली. परिणामी चित्रपटाकडे मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि चित्रपट फ्लॉप झाला. आता बॉयकॉट ट्रेंडबद्दल ‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना यांचे वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी चित्रपटावरील बहिष्काराचे समर्थन केले असून सोशल मीडियावर सुरू असलेली ही मोहीम योग्य असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

मुकेश खन्ना म्हणाले, “आमिर खान अतिशय फालतू गोष्टी बोलला होता. जर तुमच्या पत्नीने तुम्हाला काही सांगितलं होतं तर तुम्ही तुमची बेडरूममधील गोष्ट स्वतःकडेच ठेवायला हवी होती. तुम्हाला सुरक्षित वाटत नाही असं तुम्ही का म्हटलं? यावर लोकांनी आमिरला भारतात सुरक्षित वाटत नसेल तर पाकिस्तानात जाऊन राहा, असं म्हटलं होतं. लोकांचा तो राग आणि प्रतिक्रिया योग्य होती. त्यात काहीच वेगळं नाही. चित्रपट न बघता बहिष्कार टाकू नका असे मी नेहमी म्हणतो, पण परिस्थिती अशी असेल तर… माफ करा मी पाहतोय आणि अनुभवतोय. आपला हिंदू समाज पूर्वी काही बोलत नव्हता, पण हिंदू समाज आता जागरूक होत आहे. लोक म्हणतायत की हिंदू जागरुक होत आहेत आणि ही चांगली गोष्ट आहे.”

“आम्ही आमचा धर्म कधीच गांभीर्याने घेतला नाही. आधी ज्यांचा ते कधीच विरोध करत नव्हते, त्यांचा आता ते विरोध करत आहेत, हे पाहून लोकांना आश्चर्य वाटतंय. हिंदू जातीयवादी का होत आहे, असा विचार इतर धर्माचे लोक करत आहेत. पण इथेही फरक बघा, जर हिंदू करत असेल जातीयवादी असेल तर दुसऱ्या धर्माने केला तर तो जातीयवादी नाही. हिंदू करत असेल तर धर्मांधता आणि दुसऱ्या धर्माचा करत असेल तर तो धर्मांध नाही. हा न्याय नाही, यात कोणतंही लॉजिक नाही. खरं तर चित्रपट न पाहता करोडो रुपये खर्चून बनवलेल्या चित्रपटाला विरोध करणं योग्य नाही. यापूर्वीही अशा प्रकारचा विरोध झाला आहे, मात्र यावेळी तर लोक सोशल मीडियावर एकत्र येऊन चित्रपट बॉयकॉट करत आहेत.”

पुढे ते म्हणाले, या मोहिमेला माझा पाठिंबा असेल, मी आतापर्यंत याबाबत कोणताही मुद्दा उपस्थित केलेला नाही. पण हिंदूंनी त्यांच्या विरोधात अशी मोहिम राबवत असेल तर तो चांगला संकेत आहे. कारण या लोकांनी अशा गोष्टी बोलणं टाळायला पाहिजे. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही शिक्षा देणार नाही, तोपर्यंत गुन्हेगार गुन्हा करणं सोडणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button