breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल

पुणे | रत्नागिरीत कोरोना विषाणूच्या एका संशयित रुग्णाला शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, कोणीही घाबरुन जावू नये. केवळ लक्षणे आढळल्याने खबरदारी म्हणून या रुग्णाला देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग झालेला नाही, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

दाखल करण्यात आलेला संशयित रुग्ण हा दिल्ली येथे गेला होता. त्याला सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागला. घशाला सूज आली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात येणार असून ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.

दरम्यान, जगभरात आणि देशात आज कोरोनाच सावट आहे. देशात २९ रुग्ण सापडलेत. साज्यात संशयित रुग्णांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसपासून दूर राहण्यासाठी गर्दी टाळता आली तर टाळावी, मोठे कार्यक्रम टाळावे, असे सगळ्यांना आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात एकही कोरोनाचा रुग्ण नाही.

मास्क वापरण्याची तशी गरज नाही. खोकला – शिंक ड्रॉपलेटसमधूनच कोरोनाचा पसार होतो. त्यामुळे काळजी घ्या. वारंवार हात धुवावे हाच कोरोनावर उपाय आहे. लोकांना जनजागृती करणे हे महत्त्वाचे आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button