breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

Aam Aadmi Party:  हुकूमशाही प्रवृत्तीच्या केंद्र सरकारचा सांगली ‘आप’तर्फे निषेध

जिल्हा समन्वयक राम पाटील  : मोदी सरकारकडून संविधानाचा अवमान

सांगली: दिल्ली सरकारला कायदे बनवण्याचा आणि नोकरीच्या वर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला नकार देणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारच्या अध्यादेशाविरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल डावलून एक प्रकारे भारतीय संविधानाचा अवमान केला आहे, अशी टीका आम आदमी पार्टीचे सांगली जिल्हा समन्वयक राम पाटील यांनी केली आहे. 

दिल्ली सरकारला कायदे बनवण्याचा आणि नोकरशहांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार ८ वर्षाच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर मा . सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा दिल्लीवासीयांच्या आणि आम आदमी पार्टीच्या बाजूचा होता दिल्ली सरकारच्या बाजूचा होता जो अधिकार सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला दिला.  तो अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारच्या अध्यादेशा विरोधात सांगली येथे निषेध करण्यात आला 

यावेळी पक्षाचे वसीम मुल्ला, सांगली जिल्हा समन्वयक राम पाटील, सांगली शहर समन्वयक आरिफ मुल्ला, सांगली रिक्षा संघटना अध्यक्ष संभाजी मोरे,  निसार मुल्ला, शिवाजी गायकवाड,  इमरान सय्यद पठाण, सतीश सौंदडे, रवी कुमार बनसोडे, संदीप कांबळे, संतोष मगदूम, रूबेन काळे, राम कोकरे, श्रीकांत चंदन वाले, युवा नेते विवेक भिंगारदिवे आदी उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यातील आम आदमी पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध फलक हातात घेऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला यावेळी केंद्र सरकार जुलमी केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी घोषणा दिल्या. 

सत्ताधाऱ्यांचा देशभरात निषेध… 

राम पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल डावलून एक प्रकारे भारतीय संविधानाचा अपमान केला आहे. या अनुषंगाने आम आदमी पार्टीचे संस्थापक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विरोधी पक्षातील पदाधिकारी यांची भेट घेऊन त्यांचा पाठिंबा मिळवला आहे. दिल्ली येथे रामलीला मैदानावरती देखील मोठ्या प्रमाणात महा रॅली या केंद्र सरकारच्या विरोधात निघत आहे. त्याच धर्तीवर ती आम आदमी पार्टीच्या वतीने आज भारतभरामध्ये देखील सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button