breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रेमडिसिव्हीर इंजेक्शनसाठी स्वतंत्र एजन्सी नेमून पिंपरी चिंचवडला पुरवठा करा – सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके

  • विभागीय आयुक्त साैरभ राव यांच्याकडे मागणी

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड शहरातील कोविड रुग्णालये व रुग्णांच्या नातेवाईकांची अजूनही रेमडिसिव्हीर इंजेक्शन मिळविण्यासाठी धावपळ होत आहे. यावर तातडीने उपाययोजना म्हणून खाजगी रुग्णालयांना रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठाधारक नेमून त्यांच्या मार्फत शहरातील खाजगी रुग्णालयांना रेमडिसिव्हीरचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली आहे.

विभागीय आयुक्त साैरभ राव यांना पत्र दिले असून त्यात म्हटले आहे की, सद्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे दरदिवशी सुमारे ३००० च्या जवळपास रुग्ण आढळून येत आहेत. महापालिकेच्या रुग्णालयाव्यतिरिक्त शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात कोविड – १९ रुग्ण दाखल होत आहेत. रुग्णसंख्या वाढल्यामुळे शहरातील बऱ्याच रुग्णांना रेमडिसिव्हीर इंजेक्शनची गरज भासु लागली आहे. परंतु शहरातील खाजगी औषध दुकानदारांना रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या विक्रीसाठी बंदी घातल्यामुळे रेमडिसिव्हीर इंजेक्शनचे गरज असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची सदर इंजेक्शन मिळविण्यासाठी धावपळ होताना दिसत आहे.

कोविड – १९ रुग्णालये व रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव कमी करण्यासाठी मा. विभागीय आयुक्त यांनी दि. ९ एप्रिल रोजी शहरातील खाजगी रुग्णालयांनी संबंधित कंपनीच्या पुरवठादाराकडे रेमडिसिव्हीर इंजेक्शनची मागणी प्रोटोकॉलनुसार नोंदवून पुरवठा करण्यात येईल, असे घोषित केले होते. तसेच, यासाठी ‍नियंत्रण कक्ष देखील उभारण्यात आला होता.

परंतु, वरील निर्णयानुसार याबाबतीत कुठलीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही. या उलट परिस्थिती आणखीनच गंभीर झालेली आहे. शहरातील एकाही कोविड-१९ च्या रुग्णालयांना अद्यापपर्यंत रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा झालेला नाही. यामुळे शहरातील कोविड रुग्णालये व रुग्णांच्या नातेवाईकांची अजूनही रेमडिसिव्हीर इंजेक्शन मिळविण्यासाठी धावाधाव होताना दिसून येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे. तरी, यावर तातडीने उपाययोजना म्हणून खाजगी रुग्णालयांना रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्वरीत रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठाधारक नेमून त्यांच्या मार्फत शहरातील खाजगी रुग्णालयांना रेमडिसिव्हीरचा पुरवठा करण्यात यावा, असेही म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button