breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

खोपोली परिसरात आढळली ‘स्नेक आय लॅसर्टा’ या दुर्मीळ प्रजातीची पाल

  • पाल हा निरूपद्रवी कीटकभक्ष्यी जीव

मुंबई |

‘स्नेक आय लॅसर्टा’ या दुर्मीळ प्रजातीची पाल खोपोली परिसरात आढळली असून प्रदीप कुलकर्णी, अमोल ठकेकर हे सर्पमित्र आपल्या मित्रांसह प्रभातफेरीसाठी गेले असता त्यांना ही पाल सापडली. जैवविविधतेने संपन्न असणाऱ्या पश्चिम घाटाजवळ असल्याने खोपोली परिसरात साप व इतर सरीसृप प्राण्यांमध्ये तसेच पक्ष्यांमध्ये बरीच विविधता आढळते. पालसदृश प्राण्यांमध्ये पाली, सरडे, सापसुरळी, श्ॉमेलिऑन, घोरपड यांचा समावेश होतो. लॅसर्टीड ही प्रजात यांपेक्षा पूर्ण भिन्न आहे.

या प्रजातीतील ‘स्नेक आय लॅसर्टा’ ही पाल संपूर्ण भारतभर आढळत असली तरी तिचे दर्शन फार दुर्मीळ आहे. ‘काही वर्षांपूर्वी अमरावतीमध्ये ही पाल दिसली होती. त्यानंतर खोपोलीमध्ये प्रथमच दिसली’, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली. ‘पाल हा सर्वसामान्यांना किळसवाणा वाटणारा प्राणी असला तरीही तो निरुपद्रवी असा कीटकभक्ष्यी जीव आहे. घरात एखादी पाल असेल तर कीटकांची व डासांची संख्या मर्यादित राहते’, असे जैवविविधताअभ्यासक कुणाल साळुंखे यांनी सांगितले.

वाचा- #Covid-19: सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये औषध, इंजेक्शन व प्राणवायूचा मुबलक प्रमाणात साठा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button