breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#Covid-19: सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये औषध, इंजेक्शन व प्राणवायूचा मुबलक प्रमाणात साठा

  • औषधे, प्राणवायूसाठी विशेष तरतूद; यंत्रणा सज्ज असल्याचा प्रशासनाचा दावा

पालघर |

जिल्ह्यतील खासगी करोना रुग्णालयांमध्ये रेमडेसिविर व प्राणवायूचा तुटवडा भासत असताना सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये औषध, इंजेक्शन व प्राणवायूचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध राहावा यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. तसेच शासकीय आरोग्य केंद्रांमधील खाटांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. एकंदरीत करोना रुग्णावरील उपचारासाठी आता सज्ज असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. जिल्ह्यत सध्या ४५ खासगी रुग्णालयांमध्ये १४०० पेक्षा अधिक रुग्णांना उपचारांसाठी दाखल करण्याची व्यवस्था आहे. यापैकी अनेक ठिकाणी गंभीर होणाऱ्या रुग्णांना रेमडेसिविरचा तुटवडा तसेच अधूनमधून प्राणवायू उपलब्धतेची समस्या निर्माण होत आहे. ग्रामीण जिल्ह्यच्या वेगवेगळ्या शासकीय रुग्णालयांमध्ये सध्या ५०० प्राणवायू खाटा उपलब्ध आहेत. ४३ अतिदक्षता व ७३ व्हेंटिलेटर खाटा कार्यरत आहेत. ही क्षमता वाढवण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पालघरमध्ये गेल्या आठवडय़ात ५० प्राणवायू खाटा वाढविण्यात आल्या असून ही क्षमता आणखी २० ने वाढवण्यासाठी नियोजन आहे.

पालघर, डहाणू, जव्हार विक्रमगड येथील शासकीय रुग्णालयांसह वाडा व मोखाडा तालुक्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये गंभीर रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन देण्याची तरतूद आहे. इंजेक्शन शासकीय व्यवस्थेसह थेट उत्पादकांकडून खरेदी करण्यात येत आहे. केंद्रांमध्ये लागणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिली. प्राणवायू पुरवठय़ात होणाऱ्या अडचणी लक्षात घेता जिल्ह्यतील दोन स्टील उद्योगांमधून रुग्णालयांना प्राणवायू देण्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाची परवानगी मिळाली आहे. तारापूरमधील विराज प्रोफाइल या कंपनीतून टीमा तसेच वेदांत रुग्णालयात प्राणवायू पुरवठा करण्यात येणार आहे तर वाडा तालुक्यातील हॅरीसन स्टील उद्योगाकडून तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांचा प्राणवायूचा पुरवठा करण्यात येईल. जिल्ह्यने ५०० प्राणवायू सिलिंडरची खरेदी केली असून त्यापैकी शंभर भरलेल्या सिलिंडरचा राखीव साठा तैनात ठेवला आहे. कुठल्याही शासकीय रुग्णालयात प्राणवायूची कमतरता भासल्यास काही तासांत हा पुरवठा पोहोचवण्याच्या दृष्टीने तयारी झाली आहे. पालघर ग्रामीण रुग्णालयात ९० प्राणवायू सिलिंडर देण्यात आले असून डहाणू, विक्रमगड, पोशेरी, जव्हार व मोखाडा येथे प्रत्येकी ५० सिलिंडरचा वाढीव साठा जिल्ह्यने आरोग्य केंद्राना दिला असून त्यामुळे रुग्णांना सुरळीतपणे प्राणवायू मिळण्याच्या दृष्टीने व्यवस्था झाली आहे.

वाचा-#Covid-19: ग्रामीण भागात आरोग्य सुविधांची मोठ्या प्रमाणावर कमतरता

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button