ताज्या घडामोडीराष्ट्रिय

1३२ प्रवासी असलेले विमान चीनमध्ये कोसळले

अनेकांच्या मृत्यूची भीती

गुआंगशी | चीनमधील गुआंगशी येथे सोमवारी दुपारी एक भीषण विमान अपघात झाला. १३२ प्रवाशांना घेऊन जाणारे चायना इस्टर्न पॅसेंजर एअरलाइन्सचे विमान हजारो फुटावरून गुआंग्शीच्या डोंगरात कोसळले आहे. या विमानातून १२३ प्रवासी आणि ९ क्रू मेंबर्स प्रवास करत होते. ज्या टेकडीवर हे विमान कोसळले तिथल्या जंगलात आग लागली आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची संख्या अद्याप समजू शकलेली नाही. मात्र अपघाताची भीषणता बघता अनेक प्रवाशांचा जीव जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बचाव पथके रवाना करण्यात आली आहेत.

चीनच्या सरकारी मीडियानुसार, फ्लाइट एमयू 5735 ने कुनमिंग चांगशुई विमानतळावरून दुपारी 1.15 वाजता उड्डाण केले. हे विमान दुपारी तीन वाजता ग्वांगझूला पोहोचणार होते. मात्र उड्डाणानंतर 71 मिनिटांत हे विमान आकाशातून 30,000 फूट खाली पडले. लँडिंगच्या ४३ मिनिटांपूर्वी विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. प्रवाशांना घेऊन जाणारे विमान बोईंग ७३७ हे विमान साडेसहा वर्षांपासून विमानसेवेत कार्यरत होते. या मॉडेलची विमाने यापूर्वी अनेकदा अपघाताला बळी पडली आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button