breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बेडरूममध्ये अडकलेल्या दीड वर्षांच्या मुलीची अग्निशमन दलाच्या जवानांनी केली सुखरूप सुटका

पिंपरी | प्रतिनिधी

बेडरूमच्या दरवाजाला आतल्या बाजूने कडी लागली अन दीड वर्षांची चिमुकली आत अडकली. पण घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या दीड वर्षांच्या चिमुकलीची सुखरूपपणे सुटका केली. बुधवारी (दि. 1) दुपारी साडेतीन वाजता खुशबू एक्सोटिका, कल्पतरू सोसायटी समोर, क्रांती नगर, पिंपळे सौदागर येथे हे रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले.

दुपारी पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाला पिंपळे सौदागर परिसरात खुशबू एक्सोटिका या सोसायटीमध्ये एक लहान मुलगी फ्लॅटमध्ये अडकली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विशाल फडतरे, बाळासाहेब वैद्य, दिग्विजय नलावडे, कृष्णा राजकर, सिद्धेश दरवेश, अर्जुन वाघमारे, स्मिता गौरकर, धनश्री बागुल, श्वेता गायकवाड आदींनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.

ईशान्वी दीपक इंगवले ही दीड वर्षांची मुलगी फ्लॅट मधील बेडरूममध्ये दरवाजाची कडी आतून लॉक झाल्याने आत अडकली होती. दरवाजा उघडता येत नसल्याने ती रडत होती. तिचे पालक देखील प्रचंड घाबरले होते. जवानांनी अग्निशमन साहित्याचा उपयोग करून दरवाज्याची कडी तोडून ईशान्वीला सुखरूपपणे बाहेर काढले. घाबरलेल्या अवस्थेतील आपलं बाळ सुखरूप बाहेर काढल्याने मुलीच्या आई-वडिलांनी अग्निशमन दलाचे आभार मानले व त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button