पिंपरी / चिंचवड

सोने म्हणून पिवळ्या धातूचे दागिने देऊन फसवणुकीचा प्रकार

पिंपरी l प्रतिनिधी

सोन्याचे दागिने म्हणून तिघांनी मिळून एका व्यक्तीला पिवळ्या रंगाच्या धातूचे दागिने दिले. हा प्रकार मंगळवारी (दि. 24) दुपारी चार वाजता जाधववस्ती बावधन येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

खुमाराम तेजाराम परमार (वय 50, रा. राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या दोन अनोळखी साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ढलाराम दर्गाराम चौधरी (वय 35, रा. बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना सोन्याचे दागिने देतो असे सांगून त्यांना एक हजार रुपये किमतीच्या पिवळ्या रंगाच्या धातूच्या मण्याच्या माळा दिल्या. आरोपींनी त्या माळा सोन्याच्या आहेत असे फिर्यादी यांना सांगून त्यांची आर्थिक फसवणूक केली. फिर्यादी यांनी पोलिसांना माहिती देत फिर्याद दिली. पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर त्याचे दोन साथीदार पळून गेले आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button