संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल; मुलीचा ‘तो’ फोटो केला ट्विट
![A case has been registered against Sanjay Raut](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/sanjay-raut-2-1-780x470.jpg)
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी राऊतांनी ट्विटरवर बार्शीतील एका पीडित मुलीचा फोटो शेअर केला. रक्ताने माखलेला हा फोटो पोस्ट करण्यात आल्याने राऊत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
संजय राऊत यांनी रक्ताने माखलेला पीडित मुलीचा फोटो ट्विट केला होता. यामुळे पीडित मुलीची ओळख समोर आल्यानं गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, आता पीडित मुलीचा फोटो ट्विट केल्या प्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवेंद्रजी, हे चित्र बार्शीतले आहे..मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजपा BJP पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे. गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत? ५ मार्चला हल्ला झाला, आरोपी मोकाट आहेत” असे ट्विट करत संबंधित मुलीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला फोटो राऊत यांनी ट्विट केला होता.