breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

पंतप्रधान मोदीवर टीका करणारा व्हिडीओ फॉरवर्ड केल्याने वकिलाविरोधात गुन्हा दाखल

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारा एक व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर शेअर केल्याने वसईतील एका वकिलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युट्युबर ध्रुव राठीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलेला एक व्हिडीओ आदेश बनसोडे यांनी फॉरवर्ड केला होता. आदेश बनसोडे हे भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) लिबरेशनचे महाराष्ट्र सचिव अधिवक्ताही आहेत.

आदेश बनसोडे यांनी पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी २० मे रोजी वसईच्या बार असोसिएशनच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ‘माइंड ऑफ अ डिक्टेटर’ या व्हीडिओची लिंक शेअर केली होती. मतदानाला जाण्यापूर्वी व्हिडिओ पहा, असा एक मेसेजही लिहीला होता. व्हीडिओ शेअर केल्याबद्दल बनसोडे यांच्याविरोधात ग्रुपमधील एका वकिलाने पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली.

हेही वाचा   –    ‘अजित पवारांचं आव्हान स्वीकारते, पण..’; अंजली दमानियांचं प्रत्युत्तर 

दुसऱ्या दिवशी, मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी स्वत: तक्रार दाखल केली आणि २१ मे रोजी गुन्हा नोंदवला. एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे की आरोपीने शेअर केलेल्या व्हीडिओने पोलीस आयुक्तांच्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केले आहे. कारण त्याच्या संदेशात उमेदवारांबद्दल खोटे दावे करण्यात आले आणि मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला गेला. मतदानाच्या निमित्ताने मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी १८ मे ते २० मे दरम्यान सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button