Breaking-newsमुंबई

रेल्वेच्या तीनही मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेच्या विविध तांत्रिक कामांसाठी रविवारी तीनही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्ग, हार्बरवरील वडाळा ते मानखुर्द दोन्ही मार्ग आणि पश्चिम रेल्वेवरील वसई रोड यार्डात ब्लॉकदरम्यान काम चालेल. वसई यार्डातील कामामुळे मालवाहतूक सेवेवर परिणाम होईल. पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा मात्र सुरळीत राहतील.

मध्य रेल्वे-मुख्य मार्ग

* कुठे: माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्ग

* कधी: स. १०.३० ते दु. ३.००

* परिणाम: ब्लॉकमुळे माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्गावरील लोकल डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाणेनंतर पुन्हा जलद मार्गावर लोकल वळवल्या जातील.

पश्चिम रेल्वे

* कुठे: वसई रोड यार्ड

* कधी: सकाळी १०.०० ते सायं. ४.०० वा.

* परिणाम: ब्लॉकमुळे मालवाहतुकीवर परिणाम होईल. मात्र लोकल गाडय़ा सुरळीत सुरू राहतील.

हार्बर मार्ग

* कधी: वडाळा ते मानखुर्द दोन्ही मार्ग

* कुठे:  स. ११.१० ते दु. ३.४० वा.

* परिणाम: सीएसएमटी, वडाळा ते वाशी, बेलापूर, पनवेलदरम्यान दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल ते मानखुर्द ते पनवेलदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group