Breaking-newsराष्ट्रिय
ऑपरेशन स्माईल – ५८१ मुलांच्या चेहर्यावर आले पुन्हा हास्य
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/child.jpg)
तेलंगणमधील सायबराबाद पोलिसांनी ‘ऑपरेशन स्माईल’ या विशेष मोहिमेअंतर्गत केवळ वर्षभरातच ५१८ बालकांची बाल मजुरी व तस्करीपासून मुक्तता केली आहे. सायबराबाद पोलिसांची ही एकप्रकारे मोठी उपलब्धी मानली जात आहे.
या विशेष मोहिमेसाठी जून २०१८ मध्ये सायबराबाद पोलिस आयुक्तांनी पथकांची स्थापना केली होती. ‘ऑपरेशन स्माईल’ अंतर्गत सायबराबाद पोलिस आयुक्तालयाच्या तीन विभागांमध्ये तीन पथक कार्यरत होती. बाल तस्करी रोखणे आणि भीक मागण्यास लावण्यासह अन्य असामाजिक कृत्य करण्यास भाग पाडणा-यांपासून या बालकांची सुटका करणे हे या पथकाचे उद्दिष्ट आहे.
सुटका करण्यात आलेल्या ५८१ बालकांपैकी ५४३ बालकांना (मुल-३३९, मुली – २०४ ) आश्रय गृहात तर ३८ बालकांना (मुल-२९, मुली – ९ ) त्यांच्या पालकांकडे सोपवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.