‘वायसीएम’मध्ये रुग्णांच्या पत्नीशी सफाई कर्मचा-याची असभ्य वर्तणूक
- ठेकेदार कंपनीने सफाई कर्मचा-याला काढले कामावरुन
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील आयसीयू दोनमध्ये एका सफाई कर्मचा-याने रुग्णांच्या पत्नीशी असभ्य वर्तंणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत रुग्णांने त्या कर्मचा-यांविरोधात आयसीयू दोनमधील परिचारिकेकडे तक्रार केल्याचे समजते आहे. त्या तक्रारीमुळे संबंधित सफाई कर्मचा-यांला ठेकेदार कंपनीने कामावरुन काढले आहे. हा प्रकार चार दिवसापुर्वी आयसीयू दोनमध्ये घडला आहे. याविषयी अनेकांना माहिती विचारण्याचा प्रयत्न केला. परंतू, याबाबत कोणीच महिती देण्यास तयार नाही. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होवू लागला आहे.
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात डाॅक्टर आणि रुग्णांचे नातेवाईकांमध्ये अनेकदा वादावादीचे प्रकार घडले आहेत. त्याचे रुपांतर हाणामारीत देखील झालेले आहे. मात्र, रुग्णालयातील महिला कर्मचारी अथवा रुग्णांच्या नातेवाईक महिलांच्या तक्रारीचे प्रमाण वाढू लागले आहे. अनेक महिला कर्मचा-यांना तेथील वरिष्ठ अथवा सहकारी कर्मचारी मानसिक त्रास दिल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यातच आता रुग्णांच्या नातेवाईक महिलांशी कर्मचारी असभ्य वर्तणूक करु लागल्याचे दिसू लागले आहे.
दरम्यान, वायसीएम रुग्णालयात साफसफाई करणा-या ठेकेदार कंपनीकडे हा कर्मचारी कामाला होता. त्या कंपनीच्या सुपरवायझर हा प्रकार समजल्यानंतर त्याने वरिष्ठांना ही माहिती दिली. त्यांनी तक्रारीची दखल घेवून सफाई कर्मचारी असलेल्या कर्मचा-याला कामावरुन तत्काळ काढले आहे.