Breaking-newsपिंपरी / चिंचवड
राष्ट्रवादी असंघटीत कामगार विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी मिना मोहिते यांची फेरनिवड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/IMG-20190608-WA0002.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस असंघटीत कामगार विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी रहाटणी येथील मिना मोहिते यांची फेरनिवड झाली आहे. जिल्हाध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचा सत्कार करून पुढील संघटनात्मक बांधणी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दारकोंडे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आदी यावेळी उपस्थित होते.