केरळमध्ये मॉन्सून दाखल; पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/gettyimages-642421166-170667a.jpg)
पुणे – केरळ आणि लक्षद्वीपमध्ये मान्सून धडकला आहे. कर्नाटकच्या किनारपट्टीवरही पावसाला सुरूवात झाली आहे. आता लवकरच पाऊस महाराष्ट्रातही बरसेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. येत्या आठ ते दहा तासात सोसाट्याच्या वाऱ्यासह अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, गोंदिया, कोल्हापूर, नागपूर, परभणी, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा या शहरांमध्ये पाऊस होईल, अशी शक्यता या खात्याने वर्तवली आहे.
As per #IndianMeteorologyDepartment, #SouthwestMonsoon2019 has finally hit #Kerala#Monsoon #MonsoonInIndia #MonsoonMadness2019 #SouthwestMonsoon #Weathertweet #WeatherForecast #WeatherUpdate #MonsoonInKerala #Keralarains #RaininKerala #RaininBengaluru #BengaLuruRains #weather
— SkymetWeather (@SkymetWeather) June 8, 2019
#WeatherAlert for #Maharashtra #Rain, #thundershower with strong #winds (40-50 kmph) is likely to affect #Akola, #Amravati, #Aurangabad, #Chandrapur, #Gondiya, #Kolhapur, #Nagpur, #Parbhani, #Pune, #Ratnagiri, #Solapur, #Wardha during next 8-10 hours.#weathertweet #weather
— SkymetWeather (@SkymetWeather) June 8, 2019
आज मुंबई शहर आणि उपनगरांतही पावसाच्या सरी झाल्या. दादर, वरळी, लोअर परळ, कांदिवली, बोरीवली, मालाड या ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. देशात यंदा सरासरी ९६ टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर राज्यात कमी पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. आता मान्सून केरळात दाखल झाला आहे त्यामुळे तो महाराष्ट्रातही दाखल होईल यात शंकाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा तर मिळेलच शिवाय पाऊस आपला बॅकलॉग भरून काढत बरसेल अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.