आकुर्डी रेल्वे स्थानकावर महिलेची प्रसुती, महापौरांच्या हस्ते मदत करणा-या महिलांचा सन्मान

पिंपरी, (महाईन्यूज) – आकुर्डी रेल्वे स्थानकावर प्रसुतीवेदना झाल्याने महिलेला तात्काळ मदत उपलब्ध करून दिल्याने प्रसुती यशस्वी झाली. त्याबद्दल प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे स्वयंसेवक, पोलीस मित्रांचा सन्मान आज महापौर राहूल जाधव आणि स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या हस्ते करण्यात आला.
आकुर्डी रेल्वे स्थानक येथे १६ मे २०१९ रोजी एका महिलेस प्रसुती कळा सुरू होउन त्रास होत असल्याचे रेल्वे स्टेशन मास्तर यांच्या निदर्शनास आले होते. त्यांनी पोलीस मित्र, प्राधिकरण नागरी सुरक्षा गंगानगर, आकुर्डी विभाग प्रमुख संतोश चव्हान यांना कळविले. संतोष चव्हान यांनी महिला पदाधिकारी मंगला घाळी, अर्चना दाभोळकर, देवयानी पाटील यांना सोबत घेतले. थेट आकुर्डी रेल्वे स्थानक तातडीने गाठले. त्या महिलेस स्थानकावरच वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली.
वेळीच मदत मिळाल्यामुळे महिलेची प्रसुती यशस्वीपणे करण्यात यश आले. त्याबद्दली समितीच्या दक्षता कमिटीमधील बाबासाहेब घाळी, अमित डांगे, नितीन मांडवे, जयप्रकाश शिंदे, जयेंद्र मकवाना, समीर चिले, तेजस सापरिया, मौसमी घाळी यांनी अँम्बुलन्स बोलावून व वायसीएम रूग्नालयात धाव घेउन महिला व नुकत्याच जन्मलेल्या बाळास योग्यरित्या मदत उपलब्ध करून दिली.
मानवतावादी मदतीचा उचित सन्मान आज महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, माजी महापौर आर. एस. कुमार, माजी उपमहापौर शैलजा मोरे, सामाजिक कार्यकर्ते प्रसेन अष्टेकर
सहा. आयुक्त अण्णा बोदडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महापौर राहुल जाधव यांनी मंगला घाळी, देवयानी पाटील, अर्चना दाभोळकर, संतोष चव्हान, अमित डांगे, विजय कुमार पाटील बाबासाहेब घाळी, तेजस सापरिया, नितीन मांडवे, मौसमी घाळी यांना सन्मानपत्र देउन सन्मानीत केले.





