Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
‘नो बॅंक चार्जेस’ खातेदाराचे अनोखे अभियान, बॅंकाकडून होणारी लूट थांबवा

– अर्थमंत्री अरुण जेटलींना पाठविणार पत्र, कष्टकरी संघर्ष महासंघाची मागणी
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महाराष्ट्रातील बँका ग्राहकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क आकारत असतात. त्यांच्या खात्यातून सतत विविध सेवा सुविधांच्या नावाखाली कपात होत असते. ही कपात म्हणजे बँकाचा ग्राहकांवर अन्याय आहे. यामुळे ग्राहक, सर्वसामान्य नागरिक, कामगार, कष्टकरी, फेरीवाले याची सरळ लूट होत आहे. त्याला विरोध करण्यासाठी आणि ही लूट थांबावी, याकरिता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना हजारो कामगारांचे पत्रे पाठवणार आहे, या मोहीमेत सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केले.
कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे चिंचवड येथे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत ‘नो बँक चार्जेस’ या आशयाचे फलक हातात घेऊन हे अभियान सुरु करण्यात आले, तुमची बँक आमच्या कष्टाची कमाई लुटत आहे. ते बंद करा. असे जाहिर फलक लावण्यात आले. यावेळी मेकंजी ड़ाबरे, मोहन आडसुळ,अनिल बारावकर ,इरफान चौधरी, वंदना थोरात, वृषाली पाटणे, मनिषा राउत, जयश्री कदम ,सुनंदा चिखले, ,माधुरी जलमूलवार, वहिदा शेख, सुरेश देडे, विजय सूर्यवंशी, शशिकला ढवळे, राजेश माने, अशोक गुप्ता, शिव गुप्ता आदी उपस्थित होते.
नखाते म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासुन राज्यातील बँका विविध बँकिंग व्यवहारावर ग्राहकाना मोठे शुल्क आकारत आहे. आधीचे प्रचलीत दर सोडून नव्याने अनेक दर आकारणी केली जात आहे. एका महिन्यात एटीएममधून ५ वेळ रक्कम काढण्याची मर्यादा, खात्यात रोकड जमा करणे, रोकड काढ़णे, कमीत कमी जमा ठेव, क्रेडिट कार्ड वापरावर शुल्क, आदिसह वेगवेगळे शुल्काचा समावेश आहे. यामुळे सर्व
सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे.
कर्ज वसुली सोडून सेवांवर कर आकारुन सर्वसामान्यांना भुर्दंड बसला आहे. ही कर आकारणी थांबवणे गरजेचे आहे. या मनमानी पद्द्तीने आकारण्यात येत असलेल्या शुल्काबाबत शासनाने ठोस निर्णय घेऊन ते रद्द करावे, यासाठी हे आभियान सुरु केले आहे. यात सामान्य खातेदारानी सहभागी व्हावे, असे आवाहन नखाते यांनी केले आहे.




