breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

शहरातील पाणी कपात…हे तर सत्ताधारी-प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे पाप- विरोधी पक्षनेता दत्ता साने

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात लोकसभा निवडणूक झाल्यानंतर महापालिकागटनेत्यांना विश्वासात न घेता सत्ताधारी भाजप पक्षाने व प्रशासनाने अचानक एक दिवसाआड पाणी कपात लादली. वास्तविक, शहरातील पाणी कपात म्हणजे सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे पाप आहे, असा घणाघात विरोधी पक्षनेता दत्ता साने यांनी केला आहे.
दत्ता साने यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पवना धरणातील पाणीसाठा उन्हामुळे झपाट्याने घटत आहे हे मान्य आहे, पण, आम्ही अगोदरपासून सांगत होतो की, शहरातील पाण्याची गळती थांबवा, अनाधिकृत नळकनेक्शन शोधून त्यांच्यावर कारवाई करा, मिळणा-या पाण्याचे योग्य नियोजन करुन पाणी पुरवठा नियमित करा. परंतु प्रशासनाकडे याबाबींकडे दुर्लक्ष केल्यामुळे एक दिवसाआड पाणी कपातीचे संकट कोसळले आहे. वेळीच पाणी गळती व अनाधिकृत नळकनेक्शन शोधून त्यांच्यावर उपाय योजना केल्या असत्या तर ही वेळ आली नसती.
वर्तमानपत्रांमध्ये बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत की, पवना बंद जलवाहिनीचे काम करण्यास संबधित ठेकेदाराने नकार दिला आहे. सन २०१४ पासून केंद्रापासून महानगरपालिकेपर्यंत सर्वत्र भाजपचीच सत्ता आहे. तरी सुध्दा हा वादग्रस्त प्रकल्प व मावळातील शेतक-यांच्या न्याय मागण्याबाबत समन्वयाने मार्ग काढण्यात भाजपाचे पालकमंत्री, खासदार, आमदार व पालिकेतील पदाधिकारी अपयशी ठरले आहेत. यामध्ये मतांचे राजकारण न करता पिंपरी चिंचवडकरांचे पाण्याची गरज लक्षात घेऊन तसेच मावळाच्या शेतक-यांना विश्वासात घेऊन मा.मुख्यमंत्र्यानी सदरचा प्रकल्प मार्गी लावणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पुणे महापालिकेने भामा आसखेड जलवाहिनीव्दारे पुणे महानगरपालिका हद्दीतील खराडी, येरवडा, धानोरी, वडगाव शेरी, विश्रांतवाडी, कळस, विद्यानगर या शहराच्या पूर्व भागातील नागरीकांसाठी पाण्याची गरज भागविण्यासाठी पोलिस बंदोबस्तात काम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजप पदाधिका-यांनी भामा आसखेडचे पाणी आणण्यासाठी काय प्रयत्न केले याचे उत्तर द्यावे.
मागील दोन अडीच वर्षापासून पालिकेत भाजपची सत्ता आहे परंतु त्यांचा कारभार पाहिला तर फक्त बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असा प्रकार आहे. प्रत्येक बाबतीत मग कचरा, पाणी, आरोग्य, वैद्यकीय वा इतर प्रश्न असो प्रत्येक वेळी विरोध पक्षाला भाजपा पदाधिका-यांना कुंभकर्णी झोपेतून जागे करावे लागते. शहरातील जनाताच आता तुमच्या कारभारास कटांळली आहे त्यामुळे आम्हांला सहानुभूतीची गरज नाही. आम्ही यापूर्वी केलेल्या कामांच्या जोरावर विधानसभेला सामोरे जात आहोत. त्यामुळे त्यांची काळजी तुम्ही करु नका.
त्यामुळे आपणांस विनंती आहे की, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प व भामा आसखेड पाणी जलवाहिनीव्दारे पाणी आणण्याचा प्रकल्प त्वरीत मार्गी लावावेत. अन्यथा पिंपरी चिंचवडची जनता आपल्याला माफ करणार नाही याची नोंद घ्यावी, असेही प्रसिद्धीपत्रकात दत्ता साने यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button