Breaking-newsआंतरराष्ट्रीय

प. बंगालमध्ये मतदान केंद्राजवळ हातबॉम्ब फेकला, मतदारांना घाबरवण्याचा प्रयत्न

पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान काही अप्रिय घटना घडल्याचे समोर आले आहेत. एका ताज्या घटनेमध्ये मुर्शीदाबाद येथील एका मतदान केंद्राजवळ काही अज्ञात लोकांनी हातबॉम्ब फेकल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या हल्ल्यामध्ये कोणतेही नुकसान झालेले नसले तरी मतदारांना घाबरवण्यासाठी हा हल्ला केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.

एम्बेड केलेला व्हिडिओ

ANI

✔@ANI

#WATCH West Bengal: Unidentified men hurled a bomb near polling booth no-27,28 in Murshidabad’s Raninagar area. #LokSabhaElection2019

१,१०३ लोक याविषयी बोलत आहेत

मुर्शीदाबाद येथील राणीनगर भागात ही घटना घडली असून येथील मतदान केंद्र क्रमांक २७ आणि २८ जवळ काही अज्ञात लोकांनी एक बॉम्ब फेकला. याचा एक व्हिडिओ माध्यमांमधून समोर आला आहे. त्यामध्ये हे मतदान केंद्र ग्रामीण आणि दुर्गम भागातील असल्याचे दिसते.

ANI

✔@ANI

West Bengal: Babulal Murmu, a polling agent found dead at his house in Buniadpur, Dakshin Dinajpur. More details awaited. #LokSabhaElections2019

२६५ लोक याविषयी बोलत आहेत

मुर्शिदाबाद येथील आणखी एका घटनेमध्ये बालीग्राम येथील मतदान केंद्रावर काँग्रेस आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या भांडणात मतदानासाठी रांगेत उभ्या असलेला एक मतदार गंभीररित्या जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. तसेच दक्षीण दीनापूर जिल्ह्यातील बुनियादपूर येथे एका पोलिंग एजंटचा मृतदेह आढळून आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button