breaking-newsपुणे

हेडफोनबाजांवरही आता दंडात्मक कारवाई

पुणे- मोबाईलला हेडफोन लावयचा, म्युझिक प्लेमध्ये जावून गाणी सुरू करायची आणि हेडफोन कानात टाकून गाडी चालवायची हे “फॅड’ शहरात अनेकवेळा पहायला मिळते. कानात हेडफोनमुळे असल्यामुळे चालकाला मागून किंवा आजूबाजूने येणाऱ्या वाहनांच्या हॉर्नचा आवाजही एकू येत नाही. तो स्वत:च्याच तंद्रीत चालेला असतो. त्यामुळे वाहतूक कोंडी किंवा अपघातांना निमंत्रण मिळते.

मोटार वाहतूक कायद्यानुसार हेडफोन वापरणे गुन्हा आहे. त्यानुसार ही कारवाई सुरू असून, पुढेही ती सुरू राहणार आहे. हेडफोन वापरून वाहन चालवल्यामुळे अनेकवेळा अपघात घडलेले आहेत. कारवाई करताना चालकांनाही सौजन्याने या कायद्याबाबत सांगितले जात आहे. चालकांनी वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये त्याचप्रमाणे हेडफोनचाही वापर करू नये.
– अशोक मोराळे, उपायुक्‍त, वाहतूक विभाग, पुणे.

या प्रकाराला आळा घालण्यासाठी पुणे शहर वाहतूक विभागाने हेडफोनचा वापर करून वाहन चालवणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा बडगा उगारला आहे. त्यामुळे वाहनचलकांनो “सावधान’ कानात असलेले “हेडफोन’ कारवाईला “पात्र’ ठरणार आहे.

मोटर वाहन कायद्यानुसार कोणतेही वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, विना हेल्मेट वाहन चालविणे, ट्रीपलसीट जाणे तसेच लायसन, गाडीचे कागदपत्र, पीयूसी नसणे हे कायद्याने गुन्हा आहे. त्याचबरोबर या ऍक्‍टमध्ये वाहन चालवताना हेडफोन, ब्ल्यूट्यूथ घालणे हा देखील गुन्हा आहे. शहर वाहतूक विभागाकडून सध्या हेडफोन किंवा ब्ल्यूट्यूथ घालून वाहन चालवणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात सुरूवात केली. आत्तापर्यंत ही कारवाई शिथिल होती. मात्र, नुकत्याच झालेल्या वाहतूक सप्ताहामध्ये वाहतूक पोलिसांनी या कारवाईवर विशेष लक्ष दिले आहे. शहरातील रस्त्यांसह महामार्गावरील रस्त्यांवर आत्तापर्यंत झालेल्या अपघातामध्ये सर्वाधिक अपघात हे मोबाईलवर बोलत असल्यामुळे झालेले असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे मोबाईलवर बोलत वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरूवात केली. मात्र, काही बहाद्दर हेल्मेटच्या आत मोबाईल ठेवून बोलत असल्याचे निदर्शनास आले. सध्या हेडफोन कानात घालायचा आणि मस्तपैकी गाणी ऐकत वाहन चालवयाचे फॅड तरूण, तरूणींमध्ये आहे. मात्र, कानात हेडफोन असल्यामुळे मागून येणाऱ्या वाहनाचा आवाज येत नाही. अशावेळी तो चालक आपल्याच तंद्रीत निघालेला असतो. त्यामुळे अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. याआधी हेडफोन वापरणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून प्रभावीपणे कारवाई होत नसायची. त्यामुळे मोबाईल नाही तर हेडफोन वापरला तरी चालतो, असा “गोड गैरसमज’ चालकांनी करून घेतला होता. मात्र, हेडफोन किंवा ब्ल्यूट्यूथ वापरणाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल होणार आहे.

पोलीस आणि चालकांमध्ये शाब्दिक बाचाबाची
शहर वाहतूक विभागाकडून यंदाच्या वाहतूक सप्ताहामध्ये वाहन चालवाताना हेडफोनचा वापर करून बोलणाऱ्या किंवा गाणी ऐकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईच्यावेळी मोबाईलवर बोलले तर गुन्हा आहे. हेडफोन वापरल्यावर कशाला गुन्हा? अशा उपप्रश्‍न चालकांकडून पोलिसांना केला जात होता. हेडफोन वापरणे कायद्याने गुन्हा आहे, असे पोलिसांकडून उत्तर आल्यावर चालक आणि पोलिस यांच्यामध्ये शाब्दीक वाद सुरू व्हायचे. अशा घटना अनेकवेळा घडल्या असून, पोलिसांची डोकेदुखी चांगलीच वाढली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button