…म्हणून प्रीती झिंटाने सेहवागला झापले!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/preity-and-sehwag.jpg)
नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्सकडून झालेल्या पराभवानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा मार्गदर्शक विरेंद्र सेहवाग आणि संघाची मालकिण प्रिती झिंटा यांच्यामध्ये वादावादी झाल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. राजस्थान रॉयल्सने दिलेले १५८ धावांचे लक्ष्य पंजाबच्या संघाला पार करता आले नाही. संघाच्या पराभवावर संतप्त झालेल्या प्रितीने सामन्याच्या रणनितीवरुन थेट सेहवागला जाब विचारला.
प्रितीचे हे वागणे सेहवागला अजिबात पटलेले नसून तो हा मोसम संपल्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या मार्गदर्शक पदाचा राजीनामा देऊ शकतो असे वृत्तात म्हटले आहे. सेहवागने किंग्ज इलेव्हन पंजाब बरोबर पाच वर्षांचा करार केला आहे. संघाशी विनाकारण छेडछाड केल्यामुळे पराभव झाला असे प्रितीचे म्हणणे होते. त्यावर सेहवागने तिला समजावण्याचा प्रयत्न केला असे सूत्रांनी सांगितले. स्फोटक फलंदाज राहिलेला सेहवाग सडेतोड बोलण्यासाठी ओळखला जातो. मात्र, सध्या तरी सेहवागने शांतता आणि संयम दाखवला आहे असे सूत्रांनी सांगितले.