Breaking-newsराष्ट्रिय
जम्मू काश्मीरमध्ये CRPF चा ताफा जात असताना कारमध्ये स्फोट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/Jammu-Blast-1.jpg)
जम्मू काश्मीरमध्ये एका कारमध्ये स्फोट झाला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर बनिहाल येथे हा स्फोट झाला. महत्त्वाचं म्हणजे, कारमध्ये स्फोट झाला तेव्हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) ताफा तेथून जात होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सँट्रो कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात कोणीही जखमी किंवा जीवीतहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र सीआरपीएफच्या गाडीचं किरकोळ नुकसान झाल्याचं कळत आहे.