Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

वसई रोड स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत

गुरुवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला. वसई रोड स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल गाड़्यांची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू आहे.

गुरुवारी सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना ऐन गर्दीच्या वेळी मनस्तापाचा सामना करावा लागला. सकाळी वसई रोड स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि याचा फटका दोन्ही दिशेकडील मार्गांना बसला. पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्यांची वाहतूक गुरुवारी सकाळी सुमारे १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू आहे.

DRM WR MumbaiCentral यांची इतर ट्विट्स पहा

पश्चिम रेल्वेने ट्विटरवरुनही याबाबत माहिती दिली आहे. लोकल गाड्यांची वाहतूक उशिराने सुरु असल्याने अनेक प्रवाशांना कार्यालयात पोहोचण्यास उशिर झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group