गोव्यात काँग्रेसने केला सत्ता स्थापनेचा दावा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/images-1q_1482182526.jpg)
पणजी – दिल्लीत भाजपचे नेते लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. लोकसभेसाठी उमेदवारांची यादी निश्चित करण्यासाठी भाजपची दिल्लीत बैठक सुरु असताना दुसऱ्या बाजूला गोव्यात काँग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेसने राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पत्र लिहले आहे. राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार बरखास्त करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने असा दावा केला आहे की भाजपकडे पुरेसे संख्याबळ नाही. राज्यात सर्वाधिक आमदार काँग्रेस सोबत असल्याचे देखील त्यांनी पत्रात म्हटले आहे.
राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला सत्ता स्थापनेची संधी दिली पाहिजे. राज्यात राष्ट्रपतीशासन आणता येणार नाही. तर तसे प्रयत्न झाले तर त्याला आव्हान दिले जाऊ शकते असे देखील काँग्रेसचे म्हणणे आहे. 2017च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 17 जागांवर तर भाजपने 13 जागांवर विजय मिळवला होता. पण अन्य पक्षांना सोबत घेऊन भाजपने सत्ता मिळवली होती.
Congress stakes claim to form government in Goa; writes to Governor to dismiss BJP-led govt which is in "minority" & call "single-largest party Congress to form govt".Also states in its letter, "any attempt to bring Goa under President's rule will be illegal & will be challenged" pic.twitter.com/EZ125NRO0a
— ANI (@ANI) March 16, 2019
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे राज्याचा कारभार कुणाच्या तरी हाती द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली होती. पण पर्रीकर जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत गोव्यात कोणतंच राजकीय संकट येणार नाही, असा दावा गोवा विधानसभेचे उपाध्यक्ष मायकल लोबो यांनी केला होता.
भाजपचे गोवा सरकारमधले उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसुझा यांचं निधन झाल्यानंतर ती भाजपची एक जागा कमी झाली. मनोहर पर्रीकर प्रत्यक्ष कामकाज पाहत नाहीत. त्यांच्याकडे 20 पेक्षा अधिक खाती आहेत. त्याचं वाटप झालेलं नाही. त्यामुळे गोव्यात प्रशासन राहिलेलं नाही, असही काँग्रेसचे म्हणणे आहे.